
खरंतर हॅलवीन नाईट म्हटली की (Halloween Night)भूत, सांगाडे, किडे-मकोडे असे काही विचित्र प्रकार समोर येतात. मात्र नुकत्याच बॉलिवूडमधील स्टार किड्सनी सेलिब्रेट केलेल्या हॅलवीन पार्टीमध्ये त्यांचा गोंडस अंदाज पहायला मिळाला. अर्पिता खान शर्माच्या घरी अहिल शर्मासोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची चिमुकली जमली होती. त्यांनी हॅलवीन पार्टी एन्जॉय केली.
अर्पिताच्या वांद्रे येथील राहत्या घरी करण जोहरची मुलं यश आणि रूही जोहर सहभागी झाले होते. सोबतच सैफिनाचा तैमुर अली खानही बॅटमॅनच्या अंदाजात दिसला. तुषार कपूरही लक्ष्यसह या पार्टीमध्ये सहभागी झाला होता.

View this post on Instagram
#taimuralikhan snapped at #ahilsharma #happybirthday bash as #batman @manav.manglani

पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये हॅलवीन नाईट ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. दरवर्षी 31 ऑक्टोबरला हॅलवीन नाईट साजरी केली जाते. ख्रिश्चन धर्मामध्ये हॅलवीन नाईटच्या रात्री मृत आत्मे पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे म्हणून त्यांच्यासाठी खास केक व इतर पदार्थांची मेजवानी केली जाते. हॉटेंड हाऊस’देखील उघडली जातात. सोबतच भोपळे दृष्ट आत्म्यांना दूर ठेवतात अशी धारणा असल्याने सजावटींमध्ये भोपळेही मोठ्या प्रमाणात वापरले जातात.