सुशांत सिंह राजपूत आणि श्वेता सिंह कीर्ति (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) चा मृतदेह 14 जून ला त्याच्या राहत्या घरात आढळला होता. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. देशातील 3 प्रमुख एजन्सी सुशांतच्या मृत्यूची चौकशी करण्याचं काम करत आहेत. अशातचं आता सुशांत सिंह राजपूत यांची बहीण श्वेता सिंह कीर्ती (Shweta Kirti Singh) ने आपल्या सोशल मीडियावर सुशांतची एक नोट पोस्ट केली आहे. ही नोट सुशांत सिंह राजपूतने लिहिलेली होती, जी त्याच्या बहिणीने शेअर केली आहे. या नोटमध्ये सुशांत जीवनाबद्दल आपला अर्थ सांगत आहे.

ही नोट शेअर करताना श्वेता सिंह कृती यांनी लिहिलं की, माझ्या भावाने ही चिठ्ठी लिहिली आहे. त्यात लिहिलेले विचार किती खोलवर आहेत ते दर्शवितात. या चिठ्ठीत सुशांतने लिहिलं आहे की, 'मी माझ्या आयुष्यातील 30 वर्षे घालविली. या 30 वर्षात काहीतरी चांगल होण्याची अपेक्षा होती. टेनिस आणि शाळेत चांगले ग्रेड करावे अशी इच्छा होती. मी आनंदी नाही. कदाचित, मी जसा आहे, त्यापेक्षा चांगल बनू शकतो. परंतु, आता मला समजले आहे की, मी संपूर्ण गेमचा चुकीचा अर्थ लावला आहे. कारण मला स्वतःला शोधायचे होते आणि मला हे जाणून घ्यायचे होत की, मी कोणत्या गोष्टीत चांगला आहे.(Sandalwood Drug Case: अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा Aditya Alva ला सँडलवुड ड्रग्ज प्रकरणात अटक; 5 महिने फरार होता )

अर्थात सुशांतने लिहिलेली ही चिठ्ठी त्यांच्या सखोल विचारांना प्रतिबिंबित करते. खरंतर सुशांतला लिहिण्याची खूप आवड होती. त्याचा हा छंद यापूर्वी बर्‍याचदा पाहिलेला आहे.