Ekta Kaul, Sumeet Vyas (PC - Instagram)

सुप्रसिद्ध अभिनेता सुमित व्यास (Sumeet Vyas) बाबा झाला आहे. सुमितची पत्नी एकता कौल (Ekta Kaul) ने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सुमितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गुडन्यूज दिली आहे. विशेष म्हणजे सुमित आणि एकताने आपल्या मुलाचे नामकरणही केले आहे.

सुमितने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मुलगा झाला आहे. त्याला वेद या नावाने आवाज देण्यात येईल. वेदच्या जन्मामुळे आई आणि बाबा खूप खुश आहेत. त्याच्यावर प्रत्येकक्षणाला प्रेमाचा वर्षाव होत आहे,' असंही सुमितने म्हटलं आहे. (हेही वाचा - Happy Birthday Ashok Saraf: 'अशी ही बनवाबनवी', 'गुपचूप गुपचूप'... पहा अशोक सराफ यांच्या सिनेमातील धम्माल विनोदी सीन्स (Watch Video))

सुमितने शेअर केलेल्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी त्यांच अभिनंदन केलं आहे. सुमितने काही दिवसांपूर्वी एकता गरोदर असल्याचं सांगितलं होतं. 2018 मध्ये सुमित आणि एकता लग्नबंधनात अडकले होते. सुमित आणि एकता सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात.

एकता कौल ही हिंदी मालिका क्षेत्रातील ख्यातनाम अभिनेत्री आहे. तर सुमितने वेबसिरीज मधून तरुणाईच्या मनात घर केलं आहे. 'वीरे दी वेडिंग', 'आरक्षण', 'पार्च्ड' चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे. याशिवाय एकताने 'रब से सोना इश्क', 'बडे अच्छे लगते हैं', 'ये है आशिकी', 'एक रिश्ता ऐसा भी', 'मेरे अंगने में', या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.