Sonu Nigam Tussle Case: सोनू निगम याच्यासोबत नेमकं काय झालं? आरोपीच्या बहिणीने केला खुलासा
Suprada Phaterpekar, Sonu Nigam | (Photo Credits: Twitter)

गायक सोनू निगम (Sonu Nigam Tussle Case) याच्यावर झालेल्या कथीत हल्ला प्रकरणाची मुंबई पोलीस (Mumbai Police) चौकशी करत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्फेकर (Suprada Phaterpekar) याच्यावर सोनू निगम याला मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सोनू निगम याच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल स्वप्नील फातर्फेकर (Swapnil Phaterpekar) यांची बहीण सुप्रदा फातर्फेकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. घडला प्रकार गैसरमजातून घडला. ज्यानंतर आम्ही सोनू निगम याची माफीही मागितल्याचे सुप्रदा फातर्फेकर यांनी म्हटले.

सुप्रदा फातर्फेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्या भावाला (स्वप्नील) सोनू निगमसोबत सेल्फी काढायचा होता. तो काढत असताना त्याच्यात आणि सोनू निगमच्या अंगरक्षकात वाद झाला. तो त्याचा चाहता आहे. पण, तो एक चुकीचा क्षण होता. घडल्या प्रकाराबद्दल नंतर आम्ही सोनू निगमचीही माफी मागितली, असेही सुप्रदा फातर्फेकर यांनी सांगितले. (हेही वाचा, गायक सोनू निगम याला मारहाण, मुंबईतील चेंबूर परिसरात आयोजित संगीत कार्यक्रमादरम्यानची घटना (Watch Video))

दरम्यान, सोनू निगम याने चेंबुर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्नील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चेंबूर पोलीस त्याला चौकशीसाठी बोलावणार आहेत. स्वप्नीलने सोनू निगम आणि त्याच्या मित्रांना मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी माहिती देताना म्हटले आहे की, चेंबूरमध्ये कार्यक्रमादरम्यान काही लोक गायक सोनू निगमसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना हाणामारी झाली. परिणामी, या घटनेदरम्यान गायकासोबत असलेले दोघेजण खाली पडले, त्यात एक जण किरकोळ जखमी झाला.

ट्विट

गायक सोनू निगमच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहीता कलम 323 , 341, आणि 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. डीसीपी हेमराजसिंग राजपूत यांनी पत्रकारांना सांगितले की, "लाइव्ह कॉन्सर्टनंतर सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना एका व्यक्तीने त्याला पकडले. यावर सोनूने आक्षेप घेतल्यानंतर त्या व्यक्तीने सोनू निगम आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींना पायऱ्यांवरून ढकलले, त्या दोघांपैकी एक जण जखमी झाला. आरोपीचे नाव स्वप्नील फातर्पेकर आहे.