Singham 3: सिंघम 3'मधील
करिना कपूर खान । Insta

Singham 3: बहुप्रतिक्षित सिंघम ३ चित्रपटा पाहण्याची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. या चित्रपटातील आणखी एका अभिनेत्रीचा लुक समोर आला आहे. दिपीका, रणवीर कपूर, टायगर श्रॉफ यांच्या लुक नंतर आणखी एका अभिनेत्रीने लुक सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर या चित्रपटात झळकणार आहे. हे पाहून करीना कपूरच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या आधी चित्रपटातील कलाकरांनी फस्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत करीनाचा जबरजस्त लूक पाहायला मिळत आहे. हातात बंदूक घेऊन चेहऱ्यावर तेज चमकताना दिसत आहे. फोटो शेअर करताना ती कॅप्शन सुध्दा लिहलं आहे. सैन्यात सामील होण्याची पून्हा वेळ आली आहे. सोशल मीडियावर करीनाचा फोटो सध्दा व्हायरल  होत आहे. करीनाच्या चाहत्यांनी या फोटोला कंमेट देखील केले आहे. सिघंम ३ साठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. रोहित शेट्टीने करीनाचा फस्ट लूक फोटो शेअर केला.

 

सिंघम चित्रपटाचे दोन्ही सिव्केल हो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची आस लागली आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज होणार आहे.  अभिनेत्री करीना कपूर ही 4 आगामी चित्रपटात काम करणार आहे. तिच्या चाहत्यांना द क्रू, वीरे द वेडिंग 4, द बकिंघम मर्डर्स आणि तख्त या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.