श्रृती हसन लवकरच बोहल्यावर चढण्याच्या तयारीत ?
श्रृती हसन (Photo Credit : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री श्रृती हसन अभिनयासोबतच उत्तम गायिका देखील आहे. अलिकडेच तिने लंडनमधील वर्ल्ड क्लास म्युझिशियनसोबत परफॉर्मन्स दिला. रिपोर्ट्सनुसार. श्रृतीचा हा शो हाऊसफुल होता. शो नंतर श्रृती मुंबईत परतली. त्यापूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केली.

या फोटोत ती बॉयफ्रेंड मायकल कोर्सेलसोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, "गुडबाय बोलणे नेहमीच चांगले वाटत नाही."

 

View this post on Instagram

 

The fake album cover always sucks saying goodbye to @themichaelcorsale #workmode #mumbaicalling #travelbunnies

A post shared by @ shrutzhaasan on

मायकल कोर्सेल हा इटालियन अॅक्टर असून तो लंडनमध्ये राहतो. मायकलने देखील श्रृतीचा यात ती लंडनमध्ये परफॉर्म करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. मायकलने लिहिले की, "अविश्वसनीय, मला या मुलीवर गर्व आहे. माझ्या शहरात तिने आपले टॅलेंट दाखवले."

 

View this post on Instagram

 

Unbelievably proud of my girl @shrutzhaasan last night, showing her god given talent to my home town!!! #london #music #takeover Xxxxx

A post shared by Michael Corsale (@themichaelcorsale) on

लवकरच श्रृती विवाहबंधनात अडकू शकते अशी चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने आई सारिका आणि मायकलची भेट घडवून आणली. भारतात आल्यानंतर मायकल देखील श्रृतीसोबत एका लग्नात सहभागी झाला होता. त्यावेळेस तो कमल हसनला देखील भेटला होता.