Shilpa Shetty Ganpati Viral Video: गणपती विसर्जनानंतर शिल्पा शेट्टी हिचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; पहा काय आहे खास
Shilpa Shetty (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. शिल्पाच्या घराच्या गणपतीचे विसर्जन (Ganpati Visarjan) झाल्यावर तिने प्रसाद मीडिया सदस्यांना वाटला. व्हिडिओत शिल्पा प्रसादाची प्लेट घेऊन बाहेर येते आणि सांगते, "प्रसाद घ्या फक्त प्लेट परत द्या." हे ऐकल्यानंतर तेथे उपस्थित सर्व लोकांना हसू आवरले नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. प्रत्येकजण याची चर्चा करत आहे. या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. करोडोंची मालकीण असलेल्या शिल्पामध्ये अजूनही भारतीय स्त्री जिवंत आहे, असे म्हटले जात आहे. दरम्यान हा व्हिडिओ सर्वांच्या हास्याचे कारण होत आहे.

पहा व्हिडिओ:

शिल्पा शेट्टी हिच्या घरी दरवर्षी दीड दिवसांचे गणपती विराजमान होतात. शिल्पा शेट्टीच्या घराचा गणपतीची चाहत्यांमध्येही उत्सुकता असते. गणपती डेकोरेनश पासून आगमन, विसर्जन मिरवणूक हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. घरच्या गणपती विसर्जनानंतर शिल्पा शेट्टी लालबागच्या राजा आणि अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात दर्शनासाठी हजेरी लावते.