आपल्या हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) व्हिडिओज ने सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असलेली हॉटबॉम्ब शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) आता एका वेगळ्याच अंदाजात आपल्याला दिसणार आहे. आपल्या 'शर्लिन चोपड़ा अॅप' (Sherlyn Chopra App) च्या माध्यमातून एकाहून एक हॉट व्हिडिओज टाकून आपल्या चाहत्यांना अक्षरश: वेडं लावले आहे. त्यातलाच एक नवा व्हिडिओ तिने आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करताच तिला 2 लाखांच्या वर लाइक्स मिळाले आहेत.
या व्हिडिओत शर्लिन तुम्हाला पिवळ्या रंगाच्या साडीत पावसात भिजताना दिसेल. यात तिच्या सेक्सी, मादक अदा अक्षरश: वेडं लावतील अशाच आहे. पाहा व्हिडिओ
या व्हिडिओत शर्लिनने परिधान केलेली पिवळी साडी पाहून तुम्हाला 'टिप टिप बरसा पानी' गाण्यामधील अभिनेत्री रविना टंडन हिची आठवण येईल. त्यावेळी ते गाणे आणि रविनाची मादक अदा खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर पाऊस आणि पिवळी साडी हे जणू स्टाइल स्टेटमेंटच बनलं होतं असं म्हणायला हरकत नाही.
हेही वाचा- मादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट
त्याचीच एक झलक आपल्याला शर्लिनच्या या व्हिडिओमध्ये दिसली असली तर तिच्या मादक आणि बोल्ड अदांना तिच्या चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. तिच्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी खूप छान कमेंट्ससुद्धा दिले आहेत. याआधी तिचे बरचसे व्हिडिओ हे बिकिनीतील होते. मात्र हा व्हिडिओ साडीतला असून तिच्या मादक अदा पावसातही आग लावतील अशाच काहीशा आहेत.