Tunisha Sharma Death Case: शीजान खानला कोर्टाचा झटका; न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
Sheezan Khan and Tunisha sharma (PC - Instagram)

Tunisha Sharma Death Case: 'अली बाबा दास्तान-ए-काबुल'चा मुख्य अभिनेता शीजान खान तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी पोलिस त्याची सतत चौकशी करत आहेत. शीजान यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, तो वसई न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी शीजानला जामीन मिळाल्यास या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाचे मत आहे.

15 डिसेंबर रोजी ब्रेकअप झाल्यानंतर शीजान खान आणि तुनिषा शर्मा यांच्यातील नाते तुटल्याचे न्यायालयाने मान्य केले. मृत्यूपूर्वी तुनिषाला थेट भेटणारा शीजान खान हा शेवटचा व्यक्ती असल्याचेही समोर आले आहे. (हेही वाचा - Sanjay Chauhan Passes Away: पान सिंह तोमर सिनेमाचे लेखक संजय चौहान यांचं निधन, वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

ब्रेकअपनंतर तुनिषा तणावात आणि नैराश्यात होती हेही कोर्टाने मान्य केले. सीसीटीव्ही फुटेजमध्येही तुनिषा मृत्यूपूर्वी शीजानच्या खोलीत होती याची पुष्टी झाली आहे. या खटल्याच्या या टप्प्यावर शीजनला जामीन मिळाल्यास या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच न्यायालयाने आरोपी शीजान खानचा जामीन फेटाळला.

तुनिषाच्या आईने शीजानवर केले गंभीर आरोप -

काही दिवसांपूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तुनिषा शर्माची आई वनिता यांनी शीजानवर आरोप केला होता की, ही आत्महत्या किंवा हत्याही असू शकते. मी हे म्हणतेय कारण शीजानने तुनिषाला दूरच्या हॉस्पिटलमध्ये नेले. सेटपासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर अनेक हॉस्पिटल्स होती. तो तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला नाही? ती श्वास घेत होती आणि तिला वाचवता आले असते.

तुनिषाने शोच्या सेटवर केली होती आत्महत्या -

तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला सकाळी मुंबईत अली बाबा-दास्तान-ए-काबुल या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली होती. तुनिषाने तिचा सहकलाकार शीजनच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. यानंतर तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी शीजान खानला अटक केली. त्याच वेळी, न्यायालयाने शीजानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तुनिषा शर्मा प्रकरणासंदर्भात शीझानची चौकशी केली जात आहे.