Master Leaked Online: विजय सेतूपती च्या 'मास्टर' चित्रपटातील सीन्स रिलीज होण्यापूर्वीचं इंटरनेटवर लिक; पायरसीमुळे नाराज झाले निर्माते
मास्टर चित्रपट (Photo Credits: Instagram)

Master Leaked Online: विजय सेतूपतींच्या (Vijay Sethupathi) बहुप्रतिक्षित तमिळ चित्रपट 'मास्टर' चे काही सीन रिलीज होण्यापूर्वीच इंटरनेटवर लिक झाले आहेत. लोकेश कनगराज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शित केलं आहे. या चित्रपटात विजय मुख्य भूमिकेत दिसणार असून विजय सेतूपती नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे काही दृश्य इंटरनेटवर लीक झाल्यामुळे सध्या हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. यासह या घटनेनंतर चित्रपट निर्मात्यांनी लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. लोकेश कनगराज यांनी आपल्या ट्विटरवर चाहत्यांना या चित्रपटातील सीन्स सोशल मीडियावर शेअर करू नका, अशी विनंती केली आहे.

चित्रपटाची निर्मिती कंपनी XB Film Creators यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "टीम मास्टरतर्फे आपणा सर्वांना विनंती आहे की, कृपया चित्रपटाचे कोणतेही लीक झालेले दृश्य शेअर करू नका. यासंदर्भातील सीन्स तुम्हाला मिळाल्यास कृपया report@blockxpiracy.com वर शेअर करून आम्हाला सूचना द्या. Sonu Sood ला मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलास, 13 जानेवापर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे पालिकेला निर्देश)

तमिळ अभिनेता विजयनेही आपल्या चाहत्यांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पहा आणि सोशल मीडियावर व्हायरल होऊ देऊ नका, असं आवाहन केलं आहे. 'मास्टर' चित्रपटामध्ये मालविका मोहनन देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 13 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होत आहे.