Salman Khan स्टारर 'Radhe' चित्रपट बनला IMDB वरील सर्वात कमी रेटिंग्सचा सिनेमा, रिव्ह्यूज पाहून सलमानच्या चाहत्यांनाही बसेल धक्का
Radhe Movie | (Photo Credits: Twitter)

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधे: युअर मोस्ट वाँटेट भाई' (Radhe: Your Most Wanted Bhai) हा सिनेमा अखेर 13 मे ला ओटीटी प्लेटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित झाला. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित व्हावा की सिनेमागृहात, याबाबत वाद निर्माण झाला होता. मात्र हा सिनेमा अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला. सलमानच्या या चित्रपटाने अनेकांची घोर निराशा केली आहे. एकीकडे सलमानचे चाहते या चित्रपटाची सोशल मिडिया प्लेटफॉर्मवर भरभरून स्तुती करत आहेत, तिकडेच दुसरीकडे समीक्षकांकडून या चित्रपटाला अॅवरेज रिव्हयुज मिळाले आहेत. IMDB वर या चित्रपटाला सर्वात कमी म्हणजे 2.4 स्टार इतकी रेटिंग मिळाली आहे.

सलमानच्या चित्रपटात लॉजिक शोधणे हे चाहत्यांसाठी थोडं दुर्मिळच आहे. केवळ सलमानच्या प्रेमापोटी आणि स्वत:चे निखळ मनोरंजन करण्यासाठी प्रेक्षक त्याचा चित्रपट पाहतात. मात्र राधे या चित्रपटाची जितकी हवा होती त्या मानाने या चित्रपटाला तितकी लोकप्रियता मिळाली नाही.हेदेखील वाचा- Radhe Box Office Collection Day 1: सलमान खान च्या 'राधे' चित्रपटाने पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई; जाणून घ्या चित्रपटाचे फर्स्ट डे कलेक्शन

Radhe IMDB Review (Photo Credits: IMDB)

याआधी सलमानच्या 'रेस 3' या चित्रपटाला IMDB वर 1.9 रेटिंग मिळाली होती. यानंतर पुन्हा राधे चित्रपटाला मिळालेली ही रेटिंग धक्कादायक आहे. IMDB च्या प्रेक्षकांनी तर या चित्रपटाला अतिशय वाईट चित्रपट अशी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटात अभिनय आणि कथा खूपच सर्वसामान्य आणि तोच तोचपणा दाखवणारी आहे.

या चित्रपटात सलमान सोबत दिशा पटानी, जैकी श्रॉफ आणि रणदीप हुडा मुख्य भूमिकेत आहेत. एवढी तगडी स्टारकास्ट असून सुद्धा हा चित्रपट चालला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवाने केले आहे.