कोरोना व्हायरसच्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली. कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी सरकारकडून घेण्यात आलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता निर्माण करत आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले. यात बॉलिवूड सेलिब्रेटींचाही समावेश आहे. सलमान खान (Salman Khan) याच्या प्रॉडक्शन हाऊसने देखील या लॉकडाऊन काळात आपले कामकाज बंद ठेवले आहे. याची माहिती कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. (Coronavirus मुळे मिळालेल्या वेळचा सलमान खान ने 'असा' केला उपयोग; पहा ही अप्रतिम कलाकृती)
सलमान खान फिल्म्सने सोशल मीडिया अकाऊंट वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, "कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने 21 दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे आम्हीही आमचे कामकाज बंद केले आहे. घरी रहा, सुरक्षित रहा."
पहा पोस्ट:
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 19 मार्च पासून टीव्ही मालिका आणि सिनेमांचे शूटिंग बंद करण्यात आले. त्यानंतर देशात 21 दिवस लॉकडाऊन असणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. लॉकडाऊनचा निर्णय हा नागरिकांच्या हितासाठी घेण्यात आलेला आहे. खुद्द सलमान खानने देखील आपल्या चाहत्यांना घरीच सुरक्षित राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.