बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमांची चलती आहे. अनेक चर्चित, प्रसिद्ध, यशस्वी व्यक्तींच्या कथा सिनेमाच्या रुपात लोकांसमोर मांडण्यात येत आहे. अशाच एका व्यक्तीच्या जीवनपट सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येमार आहे. ती व्यक्ती आहे बँडमिंटनच्या मैदानात सर्वांचे मन जिंकणारी सायना नेहवाल (Saina Nehwal). परिणीती चोपडा (Parineeti Chopra) या सिनेमात सायनाची भूमिका साकारत आहे. सायना नेहवाल बनून परिणीती चोपडा बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
हा टीझर 1 मिनिट 23 सेकंदाचा असून महिला सशक्तीकरणाने याची सुरुवात होते. यात बॅडमिंटन कोर्डवरील सायनाच्या भूमिकेतील परिणीती ची झलक पाहायला मिळत आहे. या टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात सिनेमाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढेल यात शंका नाही. (बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक 'या' दिवशी होणार रिलीज)
पहा व्हिडिओ:
यापूर्वी सायनाच्या भूमिकेत श्रद्धा कपूर झळकणार होती. मात्र बिझी शेड्यूलमुळे तिने सिनेमातून हात मागे घेतला. त्यानंतर परिणीती ची या सिनेमासाठी निवड करण्यात आली. दरम्यान, या सिनेमात मानव कौल पुलैला गोपीचंद यांची भूमिका साकारत आहे. तर अमोल गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.