
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी भारतात 3 मे पर्यंत ठेवण्यात आलेला लॉकडाऊन आता 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतय. त्यात केस वाढत असून कापायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येपासून बॉलिवूडकरही दूर राहिले नाही. बॉलिवूड स्टार नवाब सैफ अली खान (Saif Ali Khan) याला देखील हा प्रश्न पडलाय तो आपल्या मुलाविषयी म्हणजेच तैमुर (Taimur) विषयी. लॉकडाऊन काळात सलून, पार्लर बंद असल्यामुळे सैफ अली खानने वेगळीच शक्कल लढविली आहे. सैफ अली खान तैमुरसासठी स्वत: हेअर स्टायलिस्ट झाला असून तो स्वत: त्याचे केस कापत असल्याचा फोटो त्याची पत्नी करिनाने (Kareena Kapoor) शेअर केला आहे.
इतकच नव्हे तर या फोटोखाली 'कोणाला हेअर कट करायचा आहे का?' असा प्रश्न करीनाने विचारला आहे.Easy Haircut Tips: लॉकडाऊनच्या काळात घरच्या घरी पुरुषांचे वा लहान मुलांचे केस कापण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
अभिनेत्री करिना कपूर खानने तिचा लेक तैमुर या क्वारंटीन काळात काय करतोय याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी #QuaranTim सोबत तैमुर चक्क घरातल्या भिंतींवर चित्र साकारत असल्याचा एक सुपर क्युट फोटो करिनाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. काही दिवसांपूर्वी सैफ अली खानने देखील करिनासाठी खास चित्ररूपी फुलांची भेट दिली होती. आता त्याच भिंतीच्या बाजूला तैमुर देखील आपली कलाकृती साकारत असल्याचा नवा फोटो आता करिनाने शेअर केला आहे.