'सिम्बा' सिनेमाच्या घवघवीत यशानंतर रोहित शेट्टीने मुंबई पोलिसांना दान केले 51 लाख रुपये
Rohit Shetty with Mumbai Police (Photo Credit: Instagram)

महिन्याभरापूर्वी प्रदर्शित झालेला रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिम्बा' (Simmba) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) स्टारर या सिनेमाने जबदस्त कमाई केली. सिनेमाप्रमाणे रोहितने खऱ्याखुऱ्या आयुष्यातही अनेकांची मने जिंकली आहेत.

'सिम्बा' सिनेमाच्या कमाईतील चक्क 51 लाख रुपये रोहितने मुंबई पोलिसांना दान केले आहेत. मुंबई पोलिसांच्या वार्षिक उमंग फेस्टीव्हल 2019 मध्ये त्याने मुंबई पोलिस कल्याण निधी म्हणून ही भलीमोठी रक्कम दान केली आहे. (100 कोटी कल्बमध्ये 8 सुपरहीट सिनेमे देणारा Rohit Shetty ठरला पहिला दिग्दर्शक!)

रोहित शेट्टीने 51 लाखांचा चेक अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण यांच्या उपस्थित पोलिसांना दिला. रोहित शेट्टीच्या सुपरहिट तीन सिनेमांत हिरो हा पोलिसाच्या भूमिकेत होता. सिंघम (2011), सिंघम रिटर्न (2014) आणि सिम्बा (2018) या तिन्हीही सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.

अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, कॅटरिना कैफ, जान्हवी कपूर, सारा अली खान, विक्की कौशल, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, जॅकलिन फर्नांडीस, फराहान अख्तर, कार्तिक आर्यन, क्रिती सेनन, शिल्पा शेट्टी, तब्बू, उर्मिला मातोंडकर, सुशांत सिंग राजपूत, अनिल कपूर, परिणिती चोप्रा यांसारख्या अनेक कलाकारांनी उमंग फेस्टीव्हलला हजेरी लावली होती.