Adipurush (PC - Twitter)

Adipurush Release Date Postponed: सुपरस्टार प्रभासच्या मेगा बजेट चित्रपट 'आदिपुरुष'शी (Adipurush) संबंधित एक मोठे अपडेट समोर येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. आता तो 2023 च्या मकर संक्रांतीला रिलीज न करता पुढच्या वर्षी 16 जूनला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांना खूप भावनिक संदेशही दिला आहे.

आदिपुरुषच्या रिलीजच्या तारखेची घोषणा करताना ओम राऊत यांनी लिहिले आहे की, जय श्री राम... आदिपुरुष हा चित्रपट आमच्यासाठी नाही, तर प्रभू श्री रामावरील आमची भक्ती आणि आमच्या संस्कृती आणि इतिहासाप्रती असलेली वचनबद्धता दर्शवतो. आदिपुरुषच्या निर्मितीशी निगडित असलेल्या लोकांनी प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव देण्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा. आदिपुरुष आता १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. भारताला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमचा पाठिंबा, प्रेम आणि आशीर्वाद हेच आम्हाला पुढे नेत आहेत. (हेही वाचा -Ranbir Kapoor-Alia Bhatt: रणबीर-आलियाला कन्यारत्न; नेटकऱ्यांकडून सोशल मिडीयावर भन्नाट मिम्सचा पाऊस)

 

View this post on Instagram

 

A post shared by Om Raut (@omraut)

निर्माते VFX वर खुश नाहीत -

या पोस्टने हे सिद्ध केले आहे की, चित्रपटाचे निर्माते त्याच्या व्हीएफएक्सवर खूश नाहीत. चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल करण्यात आले. त्यानंतर आता निर्मात्यांना रिलीजची तारीख वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी टीमला सर्व दृश्यांवर पुन्हा काम करण्यास सांगितले आहे. ओम राऊत यांनीही आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, त्यांना अधिक वेळ द्यायचा आहे.

जून 2023 मध्ये रिलीज होणार 'आदिपुरुष' -

वृत्तानुसार, प्रभास, क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' चित्रपटाचे निर्माते या चित्रपटावर पुन्हा काम करण्यासाठी सुमारे 80-100 कोटी रुपये खर्च करू शकतात. तसेच, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्याबाबत अनेक दिवसांपासून अटकळ बांधली जात होती. चित्रपटाचे व्हीएफएक्स आणि रावण बनलेल्या सैफ अली खानच्या लूकची सोशल मीडियावर ज्या प्रकारे खिल्ली उडवली जात आहे, अशा स्थितीत चित्रपट रिलीज करण्याचा धोका निर्माते घेत नाहीत.