
Dhurandhar First Look: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) चा आज 40 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने, 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात आर माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये रणवीरच्या भूमिकेची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. 'धुरंधर' चित्रपटाच्या टीझरमध्ये तुम्हाला अभिनेता आर माधवनचा आवाज ऐकू येईल. टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन, ड्रामा आणि स्टंट दाखवण्यात आला आहे.
धूरंधरमधील रणवीर सिंगचा पहिला लूक व्हायरल -
अभिनेत्याच्या अॅक्शन लूकमुळे धुरंधरचा टीझर सध्या चर्चेत आला आहे. कॉमेडीसह जबरदस्त अॅक्शन, त्याचा दमदार अवतार आणि सर्व कलाकारांच्या लूकने इंटरनेट वापरकर्त्यांना थक्क केले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील इतर कलाकार, माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना या सर्वांनाच लोक पसंत करत आहेत. (हेही वाचा - Punha Shivajiraje Bhosle Teaser: महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' ची झलक आली समोर; दिवाळीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video))
धुरंधरचा टीझर -
View this post on Instagram
धुरंधरच्या टीझरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सनी देओलची झलकही पाहायला मिळत आहे. आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारत आणि पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात 70 च्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात आला आहे.