अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या बोल्ड फोटोशूटमुळे (Bold Photoshoot) जास्त चर्चेत आहे. रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता रणवीरला आणखी एका बोल्ड अॅड शूटसाठी आमंत्रण मिळाल्याचे वृत्त आहे. हे आमंत्रण रणवीर सिंगला पेटा इंडियाने (People for the Ethical Treatment of Animal) दिले आहे. वृत्त आहे की पेटा इंडियाने आपल्या एका जाहिरात मोहिमेसाठी रणवीरशी संपर्क साधला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंग 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' साठी पूर्णपणे शाकाहारी आहार घेत आहे. म्हणूनच पेटाने त्याच्याची संपर्क साधला आहे.
पेटा इंडियाने पाठवलेल्या पत्रात अभिनेत्याला शाकाहाराचा प्रचार करणाऱ्या मोहिमेत सामील होण्याची विनंती करण्यात आली आहे. या पत्रात या मोहिमेशी संबंधित असलेल्या इतर सेलिब्रिटींच्या नावांचाही उल्लेख आहे. शाकाहारी असण्याचे आरोग्य फायदेही पत्रात नमूद केले आहेत. यासोबत पत्रात विचारणा केली आहे की, ‘प्राण्यांबद्दल लोकांमध्ये दया आणि करुणा वाढवण्यासाठी तुम्ही पेटा, इंडियाच्या बोल्ड जाहिरातीत सहभागी होण्यास तयार आहात का?’ आता पेटा इंडियाचे हे आमंत्रण रणवीर नाकारतो की स्वीकारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सेलिब्रिटी आणि पब्लिक रिलेशन्स, पेटा इंडियाचे उपाध्यक्ष यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, 'माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही जीव असतो. त्यांनाही भावना असतात. ते एक भिन्न व्यक्तिमत्त्व आहेत, त्यांना वेदना जाणवू शकतात. त्यांनाही कुटुंबासोबत राहायचे आहे आणि कुटुंबासोबत मरायचे आहे. रणवीर सिंग इतरांना शाकाहारी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि प्राणी वाचवण्याच्या मोहिमेला पुढे नेण्यासाठी योग्य आहे.’ (हेही वाचा: Malaika Arora चा बोल्ड अवतार पाहून चाहत्यांच्या उडाले होश, सेक्सी फोटो बघून व्हाल वेडे)
दरम्यान, रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर अनेकांनी आक्षेप घेतला असेल, पण बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते त्याच्या समर्थनार्थ उभे राहिलेले दिसले. विद्या बालनपासून ते आलिया भट्टपर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्याच्या न्यूड फोटोशूटचे कौतुक केले.