बाहुबली फेम भल्लालदेव म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका राणा दग्गुबाती Rana Daggubati लवकरच बोहल्यावर चढणार आहे. येत्या 8 ऑगस्टला राणा आणि मिहिका (Mihika) लग्नबंधनात अडकले जाणार आहे. या दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. बुधवारी म्हणजेच 5 ऑगस्टला या दोघांच्या घरी हळदी समारंभा पार पडला. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत घरच्या घरी अगदी साधेपणाने हा सोहळा पार पडला. या समारंभात मिहिकाच्या गालावर चढलेल्या हळदीचा रंग काही औरच होता. या सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर सध्या व्हायरल होत आहेत.
मिहिकाने हळदी समारंभासाठी पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. यात ती खूपच सुंदर दिसत होती. मिहिकाने आनंद काबराने डिझाईन लेहंगा परिधान केला होता. त्यावर सिरेमिक ज्वेलरी घातली होती.
पाहा फोटोज:
View this post on Instagram
Mr and Mrs. #RanaMiheeka 💞👌😍 #beautifulpair @ranadaggubati #RanaDaggubati #MiheekaBajaj
हेदेखील वाचा- अभिनेता राणा दग्गुबाती च्या होणा-या बायकोने मास्क घालून केले झकास प्री-वेडिंग फोटोशूट (See Pics)
View this post on Instagram
New bride-to-be #MiheekaBajaj 💛💚 looks Gorgeous in Haldi ceremony! 👌😍😍 @ranadaggubati #RanaMiheeka #Miheeka #RanaDaggubati #HaldiCeremony
राणा दग्गुबाती और मिहीका बजाज यांचे लग्न येत्या 8 ऑगस्टला हैदराबादच्या रामानायडू स्टुडिओमध्ये होईल आणि यात 30 लोकांपेक्षा जास्त लोक सामील नसणार. हे लग्न तेलुगू आणि मारवाडी या दोन्ही पद्धतीने होईल. मिडिया रिपोर्ट्सनुसार, या लग्नात येणा-या सर्व पाहुण्यांची कोविड-19 ची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच लग्नसोहळ्यात प्रत्येक ठिकाणी सॅनिटायजर ठेवण्यात येईल आणि सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले जाईल.