Rajkummar Rao: बॉलिवूड नेपोटिझमवर राजकुमार रावने केले वक्तव्य, दाक्षिणात्य चित्रपटांचे केले कौतुक
Rajkummar Rao (Photo Credit - Twitter)

राजकुमार रावचे (Rajkummar Rao) नाव बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. राजकुमार रावने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता राजकुमार राव लवकरच त्याच्या 'हिट: द फर्स्ट केस' (HIT The First Case) या क्राइम थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचा काही दिवसापुर्वी ट्रेलर रिलीज केला आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत अभिनेत्री सान्या मल्होत्राही (Sanya Malhotra) दिसणार आहे. दरम्यान, अभिनेता राजकुमार राव याने घराणेशाहीबाबत (Nepotism) वक्तव्य केले आहे. यासोबतच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचेही कौतुक केले आहे. अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या आगामी सायको-थ्रिलर चित्रपट हिट: द फर्स्ट केसमुळे चर्चेत आहे. चित्रपट रिलीज पुर्वी राजकुमार बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिझमबद्दल खुलेपणाने बोलला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम नेहमीच असेल 

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम नेहमीच असेल असे त्याने म्हटले आहे. राजकुमार यांनी असेही सांगितले की, घराणेशाही अस्तित्वात आहे, परंतु या क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्याने त्याच्या मित्रांबद्दल आणि जयदीप अहलावत आणि प्रतीक गांधी सारख्या वर्गमित्रांबद्दल देखील सांगितले ज्यांना OTT प्लॅटफॉर्मद्वारे ओळख मिळत आहे. ते म्हणाले की, घराणेशाही असेल, पण तुमचे काम आणि प्रतिभा बोलते.

 

View this post on Instagram

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

दाक्षिणात्य चित्रपटाचे केले कौतुक 

एका मुलाखतीदरम्यान, अभिनेता राजकुमार रावनेही हिट चित्रपट आणि त्याला आवडलेल्या चित्रपटांबद्दल सांगितले. राजकुमार म्हणाले की, हिट चित्रपटाचा फॉर्म्युला कोणालाच माहीत नाही. तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागेल आणि नंतर ते नशिबावर सोडावे लागेल. तो म्हणाला की, 'दक्षिणात्य चित्रपट चांगले का चालतात याचा मी विचार केला नाही, कदाचित ते चांगले चित्रपट आहेत, मेहनत दाखवतात. पण माझा विश्वास आहे की सिनेमा अनेक गोष्टींतून जातो.' (हे देखील वाचा: Shaktimaan: मोठ्या पडद्यावर 'शक्तीमान'चे पुनरागमन, 'या' बॉलिवूड अभिनेत्याला सुपरहिरो भूमिकेची ऑफर!)

'हिट द फर्स्ट केस' क्राइम थ्रिलर चित्रपट

राजकुमार राव लवकरच त्याच्या 'हिट द फर्स्ट केस' या क्राइम थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, राजकुमार राव एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे जो त्याच्या भूतकाळातील आठवणीमुळे मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्याचवेळी अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​त्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अभिनेता एका बेपत्ता मुलीचे प्रकरण सोडवताना दिसत आहे.