शिल्पा शेट्टी चा #flipthechallenge मधील राज कुंद्रा चा अवतार पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर, पाहा टिकटॉक व्हिडिओ
Raj Kundra (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या योगा व्हिडिओज मुळे सोशल मिडियावर जितकी चर्चेत आहेत तितकीच लोकप्रियता तिचा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या टिकटॉक व्हिडिओला देखील मिळाली आहे. सध्या टिकटॉकवर #Flipthechallenge आहे. यामध्ये दोन व्यक्ती एका गाण्यात लगेचच दुस-याच्या वेषात स्विच होतात. हे पाहताना खूप मजेशीर वाटतय. यात शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा ने देखील हा व्हिडिओ बनवला आहे. यात राज चा अवतार पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

या व्हिडिओमध्ये राज कुंद्रा काही वेळात शिल्पाच्या वेषात स्विच करतो, ते पाहणे खूपच मजेशीर वाटत आहे.

पाहा व्हिडिओ:

हेदेखील वाचा- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी कन्यारत्न; Surrogacy मार्फत दुसऱ्यांदा मिळवलं मातृत्व

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पुरण पोळीची रेसिपी सांगणारा व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने हेल्दी गव्हाची पुरण पोळी बनवली होती. ही पोस्ट शेअर करताना शिल्पा शेट्टीने गुढी पाडव्या विषयी काही माहिती सांगितली होती.