Porn Case Controversy नंतर पहिल्यांदा एकत्र दिसले Raj Kundra आणि Shilpa Shetty; जोडीने घेतले अनेक तीर्थस्थळांचे दर्शन (See Photos)
शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा (संग्रहित संपादित प्रतिमा)

पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा (Raj Kundra) तुरुंगात गेल्यानंतर शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पती राज याला घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याची बातमी आली होती. मात्र, आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंनी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक आणि जामिनानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच एकत्र दिसले. राज कुंद्राला जुलैमध्ये अटक करण्यात आली होती आणि सप्टेंबरमध्ये तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. आताची ही छायाचित्रे हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील आहेत, जिथे दोघे मंदिरातून बाहेर पडताना एकत्र स्पॉट झाले.

तुरुंगातून सुटल्यानंतर राज कुंद्रा कुठेही सार्वजनिक ठिकाणी दिसला नव्हता. आता पहिल्यांदा धर्मशाळा येथे तो दिसला. यावेळी राज कुंद्राने पिवळा कुर्ता आणि पांढरा पायजामा घातला होता, तर शिल्पा शेट्टी पिवळी सलवार आणि कमीजमध्ये दिसली. दोघांनी मिळून श्री ज्वालामुखी शक्तीपीठाला भेट दिली. यावेळी दोघेही आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात दिसून आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by GLAM_UNIVERSE (@vinitasaman123)

तुरुंगातून सुटल्यापासून फक्त सार्वजनिक ठिकाणीच दिसला नाही तर, तो सोशल मीडियातूनही गायब होता. काही दिवसांपूर्वी राजने त्याचे ट्विटर आणि इन्स्टाग्राम  दोन्ही सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले होते. याउलट, शिल्पा सोशल मीडियावर नेहमीप्रमाणेच सक्रिय आहे. सध्या शिल्पा कुटुंबासह हिमाचल प्रदेशमध्ये आहे.  यापूर्वी राज कुंद्राच्या जामीनानंतर शिल्पा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेली होती. (हेही वाचा: Into the Wild: Vicky Kaushal झळकणार Bear Grylls च्या शो मध्ये; 12 नोव्हेंबरला होणार प्रिमियर)

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राला दोन महिन्यांनी 20 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. याप्रकरणी 19 जुलै रोजी राज कुंद्रा, रायन थोरपे यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली होती. राजवर पॉर्न व्यवसायात गुंतल्याचा आरोप आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये राजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.