Radhika Apte Became Mother (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Radhika Apte Became Mother: लग्नाच्या 12 वर्षानंतर बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) आई झाली आहे. राधिकाने आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर एका आठवड्यानंतर चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. राधिकाने स्वत: ती मुलाची आई आहे की मुलीची हे उघड केले नसले तरी तिची मैत्रिण सारा अफझलने अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पोस्टवर टिप्पणी केली की, 'माय बेस्ट गर्ल्स'. राधिका आपटेने आपल्या बाळाला स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती लॅपटॉपवर काम करत आहे आणि तिच्या लहान मुलीला स्तनपान करताना दिसत आहे.

राधिका आपटेच्या या फोटोवर चाहत्यांकडून खूप कमेंट्स येत आहेत. चाहते अभिनेत्रीचे आई झाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत. फोटोत राधिकाच्या लहान मुलीचा चेहरा दिसत आहे. राधिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत लिहिले, 'बाळ झाल्यानंतर माझी कामासंदर्भातील पहिली मिटिंग. बाळ एक आठवड्याचे आहे आणि ते स्तनपान करत आहे.' (हेही वाचा - Actor Radhika Apte Pregnant: अभिनेत्री राधिका आपटे होणार आई; BFI London Film Festival च्या रेड कार्पेट वरील पहा फोटोज)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

दरम्यान, लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये राधिका आपटेला तिचा बेबी बंप फ्लाँट करताना पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. राधिकाने तिची गर्भधारणा गुप्त ठेवली होती, त्याचप्रमाणे तिने बाळाची प्रसूती आणि लिंग देखील गुप्त ठेवले आहे. याआधी राधिका आपटेने 'ईटाईम्स'ला सांगितले होते की, यापूर्वी तिचा प्रेग्नन्सी अधिकृतपणे जाहीर करण्याचा कोणताही विचार नव्हता. तिला ही बाब खाजगी ठेवायची होती. राधिकाने असेही सांगितले होते की, तिच्या प्रेग्नेंसीबद्दल समजल्यानंतर ती दोन आठवडे हे स्वीकारू शकली नाही. याचे कारण असे की, तिने आणि तिच्या पतीने मूल होण्याची योजना आखली नव्हती.