Daljeet Kaur (PC - Facebook)

Daljeet Kaur Passes Away: पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर (Daljeet Kaur) यांचे गुरुवारी पंजाबमधील लुधियाना (Ludhiana) जिल्ह्यात निधन झाले. त्यांनी अनेक सुपरहिट पंजाबी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या असून तिची गणना यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. दलजीत कौर यांनी वयाच्या 69 व्या वर्षी सुधर येथील चुलत भावाच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

वयाच्या 69 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारी पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर एका गंभीर आजाराने त्रस्त होती. तिचा चुलत भाऊ हरिंदर सिंग खंगुराच्या म्हणण्यानुसार, कौर गेल्या तीन वर्षांपासून ब्रेन ट्युमरने त्रस्त होत्या आणि गेल्या एक वर्षापासून कोमात होत्या. अभिनयाच्या दुनियेसोबतच दलजीत कबड्डी आणि हॉकीच्या देखील खेळाडू होत्या. त्यांच्या निधनावर पंजाबी अभिनेत्री नीरू बाजवा, गायक मिका सिंग यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. (हेही वाचा - अभिनेत्री Denise Richards आणि पती  Aaron Phypers यांच्यावर प्राणघातक हल्ला, सर्वांसमोर अंधाधुंद गोळीबार)

दलजीत कौर यांच्यासंदर्भात सतीश शाह यांनी ट्विटरवर लिहिले, "एक प्रिय मित्र आणि बॅचमेट, जेष्ठ पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांचे या महिन्याच्या 17 तारखेला निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. FTII 1976 बॅच."

दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कौरने 1976 मध्ये 'दाज' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. दलजीत कौरने 10 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तर पंजाबी भाषेतील 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. दिलजीत कौरने 'पूत जट्टां दे' (1983), 'मामला गड़बड़ है' (1983), 'की बनू दुनिया दा' (1986), 'पटोला' (1988) आणि 'सईदा जोगन' यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.