प्रियांका चोप्रा हिला सोशल मीडियामधील पोस्टमधून मिळणाऱ्या मानधनाची किंमत ऐकून तुम्हीही चक्रवाल
प्रियंका चोप्रा (Photo Credits : Instagram)

देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिची चर्चा नेहमीच सोशल मीडियात पाहायला मिळते. तर प्रियांका हिचे इन्स्टाग्रामवरील (Instagram) फॉलोअर्सची संख्या तब्बल 43,038,343 एवढी आहे. प्रियांका चोप्रा ही फक्त सिनेमाच नाही तर जाहीरात, इव्हेट्ससह सोशल मीडियावर पोस्टमधून करोडो रुपये कमवते. इन्स्टाग्रामवरील 2019 च्या श्रीमंत व्यक्ती (Rich List) मध्ये बॉलिवूडमधील ती एकमेव अभिनेत्री ठरली आहे.

HopperHQ यांनी जाहीर केलेल्या रिच लिस्ट मधून ही माहिती समोर आली आहे. तसेच प्रियांका चोप्रा इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी किती रुपयांचे मानधन स्विकारते हे सुद्धा उघडकीस आले आहे. तर प्रियांका इन्स्टाग्रावरील एका पोस्टसाठी तब्बल 1.87 करोड रुपये मानधन घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच प्रियांका हिची 19 व्या स्थानी वर्णी लागली आहे. प्रियांकासह विराट कोहली याचे नावसुद्धा श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झळकले आहे.(प्रियांका चोप्रा ने शेअर केला Smoking करतानाचा कूल फोटो, आता अस्थमा कुठे गेला? म्हणत नेटकऱ्यांनी घेतली शाळा)

तर प्रियांका लवकरच तिचा आगामी चित्रपट द स्काय इज पिंक मधून झळकणार असून 11 ऑक्टोंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित शरफ सुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत.