
अभिनेता प्रतिक बब्बर (Prateik Babbar) याने नावामध्ये बदल करत आता अधिकृतपणे प्रतिक स्मिता पाटील (Prateik Smita Patil) केले आहे. आपल्या नावामध्ये बदल करत आता त्याने आपल्या दिवंगत आईला आदरांजली अर्पण केली आहे. दरम्यान स्मिता पाटील या कसदार मराठी अभिनेत्री होत्या. प्रतिकच्या जन्मानंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. नुकतेच प्रतिकने दुसरं लग्न केले. प्रिया बॅनर्जी सोबत तो विवाहबंधनात अडकला आहे. या लग्नात राज बब्बर आणि त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीच नसल्याने राज बब्बर आणि त्यांच्या मुलामधील ताणलेल्या संबंधांची चर्चा सुरू झाली होती.
प्रतिक बब्बर आता आईचं नाव लावणार
अभिनेता प्रतिक बब्बर आता आईचं नाव लावणार आहे.Filmfare सोबत बोलताना त्याने दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये 'आता नावामध्ये बदल करून आईचं नाव लावण्यामध्ये मी तिचा वारसा पुढे घेऊन जात आहे. "प्रतिक स्मिता पाटील हे एक शक्तिशाली नाव आहे आणि स्मिता पाटील यांचा एक मोठा वारसा आहे. मी फक्त तिच्या शक्तीला स्वीकारत आहे. मी दिवंगत महान दिग्गज स्मिता पाटील यांचा मुलगा आहे." जाणून घ्या दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याबद्दल काही खास गोष्टी.
आर्या बब्बर आणि जुही बब्बर हे राज बब्बर यांच्या पहिल्या पत्नी नादिरा बब्बर यांच्यापासून झालेली मुले आहेत. प्रतीक हा त्यांचा दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. स्मिता पाटील यांना जन्म देतानाच त्यांचे निधन झाले. प्रतीक आणि प्रियाचे लग्न Rock Cliff, येथे झाले, जे स्मिता पाटीलने तिच्या मुलासोबत राहण्यासाठी विकत घेतलेले घर होते, पण, नियतीच्या मनात वेगळेच होते. प्रतीकने असेही सांगितले की आईने प्रियाला स्वप्नात सांगितलं की त्यांचं लग्न या Rock Cliff,घरात व्हावं.
प्रतिक स्मिता पाटील आता सलमान खानच्या 'सिकंदर' सिनेमामध्ये झळकणार आहे. 30 मार्चला 'सिकंदर सिनेमा रीलीज होणार आहे.