बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता ची मुलगी मसाबा गुप्ताने घेतला घटस्फोट: पहा काय आहे पती मधू मंटेना यांच्यापासून वेगळ होण्याचं कारण
Neena Gupta and Masaba Gupta (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) त्यांच्या बोल्ड राहण्यामुळे नेहमी चर्चेत असतात. नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता (Masaba Gupta) हिने पती मधू मंटेना (Madhu Mantena) यांच्यापासून घटस्फोट (Divorce) घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नीना गुप्ताच्या नावाची चर्चा चित्रपटसृष्टीत होऊ लागली आहे. मसाबा आणि मंधू मंटेना यांनी 2019 मध्ये न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज बांद्रा न्यायालयाने या दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे.

नीना गुप्ता यांनी लग्नाआधी मसाबाला जन्म दिला आहे. म्हणजेच नीना गुप्ता विवियन रिचर्ड्स यांच्यापासून कुमारी माता बनली होती. त्यानंतरच्या काळात नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स  यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नीना गुप्ता यांनी मसाबाचा सांभाळ केला. (हेही वाचा - 'हिंदू-मुस्लिम...भाई-भाई' म्हणत रितेश देशमुख ने टिक टॉक व्हिडिओ शेअर करून दिला ऐक्याचा संदेश; पहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

Everybody wish my MA a very happy birthday 🥳 🧡🧡🧡 @neena_gupta

A post shared by Mufasa✨🌙 (@masabagupta) on

 

View this post on Instagram

 

Go green 💚 makeup : @eshwarlog 💚

A post shared by Mufasa✨🌙 (@masabagupta) on

दरम्यान, नीना गुप्ता यांनी 2015 मध्ये मसाबाचा विवाह मधू मंटेना याच्याशी करून दिला होता. मधू मंटेना हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आहेत. परंतु, 2018 मध्ये मसाबा आणि मधू मंटेना या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर मसाबाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मधू मंटेनापासून वेगळं होणार असल्याच सांगितलं होतं.

2019 मध्ये या दोघांनी न्यायालयात घटस्फोटासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायालयाने सुनावणी दिली. त्यानुसार, मसाबा आणि मधू मंटेना आजपासून पती-पत्नी या नात्यातून मुक्त झाले आहेत. नीना गुप्ताप्रमाणे त्यांची मुलगी मसाबाही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. मसाबा ही हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तसेच मधू मंटेना हेदेखील प्रसिद्ध निर्माता आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी सिनेमाची निर्मिती केली आहे.