मुंबई: अभिनेत्री किम शर्मा हिच्याविरोधात तक्रार दाखल; पगार थकवून धमकवल्याने मोलकरणीची पोलिसांत धाव
Kim Sharma (Photo Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) हिच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोलकरणीचा महिन्याभराचा पगार थकवल्याने गुरुवारी (18 एप्रिल) मोलकरणीने तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नम्रता सोळंकी (Namrata Solanki) असे मोलकरणीचे नाव असून तिने मुंबईतील खार पोलिस स्टेशनात किम शर्माविरोधात तक्रार दाखल केली आहे.

किमकडे महिन्याभराच्या पगाराची मागणी केली असता दिवसभर थांब तरच पगार मिळेल, असे नम्रताला सांगण्यात आले. त्यास तिने नकार दिल्याने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही किमने दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. (मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने फॅशन डिझायनरला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार)

या प्रकरणी किम शर्मा विरोधात अदखलपात्र गुन्हाची नोंद झाली असून पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.