A photo of KRK (Pic Credit: Twitter)

अभिनेता कमल राशिद खान उर्फ ​​केआरकेला (KRK) कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. सोशल मीडियावर आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीमुळे तो बर्‍याचदा चर्चेत राहतो. या अभिनेत्याचा वादाशी दीर्घ संबंध आहे. आता एका फिटनेस मॉडेलने केआरकेवर बलात्काराचा (Rape) प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्याच्याविरोधात मुंबईत एफआयआर नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार 26 जून रोजी त्याच्याविरुध्द मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केआरकेने यासंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, एफआयआरची प्रत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केआरके आधीच सलमान खानच्या मानहानीच्या प्रकरणात कोर्ट-कचेरी प्रकरणात अडकला आहे. दरम्यान, आता फिटनेस मॉडेलच्या आरोपाने सर्वांनाच धक्का बसला. केआरकेवर गंभीर आरोप करणारी फिटनेस मॉडेल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. बऱ्याच दिवसांपासून आपल्या दुबईच्या घरी असलेल्या केआरकेविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान खानवरील वादामुळे केआरके गेल्या एक महिन्यापासून चर्चेत आहे. सलमान खानच्या कंपनीने केआरकेविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. केआरकेने सलमान खानला 'गुंडा' म्हणत त्याची कंपनी 'बीइंग ह्यूमन' वर पैशाच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. केआरकेला कोर्टाने कठोर सूचना केल्या आहेत की, सलमान खान किंवा त्यांच्या कंपनीबद्दल सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या वाईट प्रतिक्रिया देणार नाहीत. (हेही वाचा: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स))

सलमानशी झालेल्या भांडणामुळे गायक मिका सिंगनेही केआरकेवर टीका केली होती. यापूर्वी मिकाने 'केआरके डॉग' हे गाणेही रिलीज केले होते. केआरकेला त्याच्या चुकीच्या भाषेबद्दल ट्विटरवर अनेकदा ट्रोल केले गेले आहे.