Salman Khan (Photo Credits: Twitter)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील नेपोटिझम प्रकारावर सडकून टीका सुरु झाली आहे. यात करण जौहर (Karan Johar), सलमान खान हे जनतेच्या रडारवर असून या दोघांविरुद्ध देखील लोकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. ज्याच परिणाम दबंग सलमान खान (Salman Khan) याच्या वांद्रयातील बीइंग ह्यूमन (Being Human) या दुकानाबाहेर काही लोकांनी जोरदार निदर्शने केली. काही सुशांत सिंह राजपूतच्या पटना मधील घराबाहेर नेपोटिजम विरोधात जोरदार निदर्शन करण्यात आली. याउलट आज मुंबईतील सलमानच्या दुकानाबाहेर ही निदर्शने पाहून हे प्रकरण आता हळूहळू चिघळू लागल्याचे चित्र दिसत आहे.

अफ्ताब सिद्दीकी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, सलमान खानच्या वांद्रयातील Being Human दुकानाबाहेर जमा झालेल्या घोळक्याने सलमान विरोधात जोरदार निदर्शने केली. 'सलमान खान मुर्दाबाद' अशी नारेबाजीही यात करण्यात आली. यावर मुंबई पोलिसांनी त्वरित प्रतिक्रिया देऊन आम्ही वरिष्ठ अधिका-यांना याबाबत माहिती दिली असल्याचे सांगितले. Sushant Singh Rajput Death Controversy: अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर करण जौहर चे इन्स्टाचे तब्बल 10 लाख फॉलोअर्स झाले कमी तर कंगना रनौतच्या च्या फॉलोअर्समध्ये झाली 'इतकी' वाढ

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील गढूळ झालेले वातावरण, राजकारण याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. नेपोटिझम मुळे सुशांतला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले हा मुद्दा त्याच्या चाहत्यांनी उचलून धरल्यामुळे अनेक बॉलिवूडकरांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.