Mamta Kulkarni (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Mamta Kulkarni Resigns As Mahamandaleshwar: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) यांनी सोमवारी एक व्हिडिओ शेअर करून अधिकृतपणे किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर (Mahamandaleshwar) पद सोडल्याची घोषणा केली. आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांच्यात ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पद देण्यावरून झालेल्या वादानंतर आता ममत कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. आता ममताने एक व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

या व्हिडिओमध्ये ममता कुलकर्णी यांनी म्हटल आहे की, मी, महामंडलेश्वर ममता नंदगिरी या पदाचा राजीनामा देत आहे. दोन्ही गटांमध्ये सुरू असलेला संघर्ष योग्य नाही. मी 25 वर्षांपासून साध्वी आहे आणि मी साध्वीचं राहणार आहे. महामंडलेश्वर म्हणून मला मिळालेला सन्मान 25 वर्षे पोहणे शिकणे आणि नंतर मुलांना ते शिकवण्यास सांगितले जाण्यासारखा होता. पण महामंडलेश्वर म्हणून माझी नियुक्ती झाल्यानंतर जो संताप व्यक्त झाला तो अनाठायी होता. मी 25 वर्षांपूर्वी बॉलिवूड सोडले आणि नंतर मी गायब झाले. मी सर्व गोष्टींपासून दूर राहिले. (हेही वाचा - Mamta Kulkarni: ममता कुलकर्णीला मोठा धक्का; किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी)

दरम्यान, पुढे ममता यांनी म्हटलं आहे की, मी जे काही केलं त्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. मी पाहिले आहे की मला महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करण्यात आल्याने अनेक लोकांना त्रास झाला, मग ते शंकराचार्य असोत किंवा इतर कोणीही असो. मला कोणत्याही कैलास किंवा मानसरोवराला जाण्याची गरज नाही, माझ्या तपश्चर्येच्या गेल्या 25 वर्षांचे विश्व माझ्यासमोर आहे, असंही ममता यांनी व्हिडिओमध्ये नमूद केलं आहे. (हेही वाचा -Mamta Kulkarni Takes Sanyaas At Mahakumbh: ममता कुलकर्णी बनली संन्यासी; गळ्यात रुद्राक्ष आणि भगवे कपडे परिधान करून पोहोचली महाकुंभ मेळ्यात (Watch Video)

या प्रकरणात संताप व्यक्त होत असल्याने अजय दास यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी या दोघींनाही पदावरून काढून टाकले. ममता कुलकर्णीने बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेक भूमिका केल्या. तथापी, शर्मिला टागोरचा मुलगा सैफ अली खानसोबतच्या 'आशिक आवारा' या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर आणि लक्सकडून 'न्यू फेस' पुरस्कार मिळाला.