Malayalam Actor Dileep Shankar Found Dead: मल्याळम सिनेमातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते दिलीप शंकर यांचे निधन झाले. आज म्हणजेच 29 डिसेंबरला सकाळी तिरुवनंतपुरममधील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. मात्र ही हत्या की आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू याला दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा - Olivia Hussey Passes Away:रोमिओ अँड ज्युलिएट चित्रपटातील अभिनेत्री ऑलिव्हिया हसी इस्लीचे निधन,73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
पाहा पोस्ट -
Malayalam Actor Dileep Shankar Found Dead In Hotel Room#TNCards #Actor https://t.co/svLcnpDcht pic.twitter.com/3Le7YOGr6C
— TIMES NOW (@TimesNow) December 29, 2024
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अभिनेता त्याच्या पंचाग्नी मालिकेच्या शूटिंगसाठी त्याच हॉटेलमध्ये थांबला होता. हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने त्याच्या मृत्यूची माहिती समोर आली. काही दिवसांपासून तो हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडताना दिसला नसल्याचेही बोलले जात आहे. दिलीप यांच्या निधनामुळे मल्याळम इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांकडून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस मृत्यूचे कारण शोधण्यात गुंतले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंचाग्नी टीव्ही शोच्या दिग्दर्शकाने खुलासा केला आहे की अभिनेता गंभीर आजाराचा सामना करत होता. आतापर्यंत या आजाराचे नाव आणि त्याच्याशी संबंधित माहिती समोर आलेली नाही. दिलीप शंकर यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तथापि, अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अधिकाऱ्यांना समजलेले नाही. त्यांच्या मृत्यूमागे कोणाचा हात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.