Malaika Arora (Photo Credits: Instagram)

Malaika Arora Bold Photo: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलाइका अरोड़ा ही आपल्या हॉटनेसने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. आपल्या सेक्सी अदांनी ती चाहत्यांना खिळवून ठेवते. मलायका सातत्याने सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटोज शेअर करत असते. याला चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत असतो. त्या फोटोजवर कमेंट्स आणि लाईक्सच्या वर्षाव होत असतो. आज देखील मलायका ने सोशल मीडियावर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. स्विम सूटमध्ये मधील मलायकाचा हा फोटो चाहत्यांना नक्कीच घायाळ करेल.

या फोटोत तुम्ही पाहू शकाल की मलायका स्विमिंग पूल मध्ये उभी राहून पोज देत आहे. स्विमिंग सूटमधील आपला हॉट फोटो शेअर करत मलायका ने लिहिले की, "हसा, आनंदी रहा आणि या वर्षाचा पूरेपर उपभोग घ्या. 2021 छान बनवा. हॅप्पी संडे." मलायकाने हा फोटोज शेअर करताच त्याला लाखो लाईक्स मिळाले.

पहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका सध्या गोव्यात आपली बहिण अमृता अरोड़ा आणि बॉयफ्रेंड अर्जून कपूर सोबत एन्जॉय करत आहे. न्यू ईअर सेलिब्रेशसाठी मलायका गोव्यात दाखल झाली आहे. यापूर्वी देखील गोव्यातील आकर्षक फोटोज आणि व्हिडिओज शेअर करुन ती चाहत्यांशी कनेक्टेड होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

दरम्यान, 2017 मध्ये अरबाज खान पासून घटस्फोट घेतल्यानंतर अर्जून कपूर सोबतची तिची जवळीक चर्चेचा विषय ठरली. अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलणे टाळले आहे. मात्र त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचे स्पष्ट होते. या वर्षात दोघेही लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.