सोहा अली खान ची मुलगी इनाया आपले वडिल कुणाल खेमू च्या वाढदिवसामिनित्त गायले गाणे, पाहा क्युट व्हिडिओ
Soha Ali Khan, Inaaya, Kunal Kemmu (Photo Credits: Instagram)

आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या मुलांनी आपल्यासाठी काही स्पेशल केलं तर प्रत्येक आईवडिलांना त्याचे अप्रूप असते. अशी काहीशी गोष्ट केलीय अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) च्या मुलीने. कुणालचा आज 37 वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची मुलगी इनाया (Inaaya) हिने त्याच्यासाठी एक सुंदर वाढदिवसाचे गाणे गायिले. तिच्या या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. इनायाची आई अभिनेत्री सोहा अली खानने (Soha Ali Khan) हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये चिमुकली इनाया आपल्या वडिलांसाठी म्हणजेच कुणाल केमू साठी पियानोनवर 'Happy Birthday' गाणे गात आहेत. त्यात तिचे निरागस हावभाव कोणाचेही लक्ष वेधून घेतील असेच आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेह-यावर देखील गोड हास्य येईल.

 

View this post on Instagram

 

Happy birthday 🎈@khemster2

A post shared by Soha (@sakpataudi) on

हेदेखील वाचा- Holi 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)

 

View this post on Instagram

 

Happy birthday @khemster2 For better or worse there’s no one I’d rather be locked down with ❤️

A post shared by Soha (@sakpataudi) on

अभिनेत्री सोहा अली खान नेदेखील आपल्या लाडक्या नवरोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोहाने कुणाल आणि इनायासह फोटो शेअर करत 'Lockdown मध्ये याच्यापेक्षा चांगला माणून असूच शकत नाही ज्याच्यासोबत मला राहायला आवडेल' असे म्हटले आहे