जयललिता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार कंगना रनौत; ऑस्कर विजेता मेकअप आर्टिस्ट जेसन कॉलिन्स साकारणार लूक
Kangana Ranaut And Jaylalitha (Photo Credits: Instagram/PTI)

तामिळनाडूच्या (Tamilnadu) दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता (Jaylalitha) यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) ही मुख्यवर्ती भूमिकेत बघायला मिळणार आहे. या सिनेमासाठी कंगनाने अगदी कंबर कसली आहे. मग ते तामिळ भाषा शिकणे असो वा भरतनाट्यमचे धडे गिरवणे कंगनाने सर्वतोपरी मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे. या सिनेमामध्ये कंगनाचा लूक सुद्धा विशेष लक्षवेधी ठरणार आहे याच कारण म्हणजे कंगना ते जयललिता असा मेकओव्हर साकारायला ऑस्कर (OScar) विजेता मेकअप आर्टिस्ट बोलवण्यात येणार आहे. 'कॅप्टन मार्व्हल' (Captain Marvel) फेम जेसन कॉलिन्स (Jason Collins) या मेकअप आर्टिस्टकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं समजतंय. याबाबत चित्रपटाचे निर्माता विष्णू इंदूरी (Vishnu Induri) यांनी ट्विटरच्या माध्यमातून घोषणा केली आहे.

कंगना या चित्रपटात चार वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. कंगनाची भुमिका अधिक प्रभावी व्हावी यासाठी आम्ही हॉलिवूड मेकअप आर्टिस्ट यांना बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा आशयाचे एक ट्विट विष्णू इंदूरी यांनी केलं आहे. (Dabangg 3 Motion Poster: सलमान खानच्या 'दबंग' स्टाईल अंदाजात सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर भेटीला; 100 दिवसांनी होणार सिनेमा रीलीज)

विष्णू इंदुरी ट्विट

याशिवाय कंगनाची बहीण रंगोली हिने सुद्धा आपल्या ट्विटर वरून या माहितीला दुजोरा दिला आहे. सोबतच 19 सप्टेंबर रोजी कंगना या लूक टेस्ट साठी लॉसएंजलिस येथे जाणार असल्याचे सुद्धा रंगोलीने सांगितले आहे. तसेच या सिनेमात एक कर्तृत्वान महान महिला दुसऱ्या महान महिलेचे पात्र साकारणार आहे त्यामुळे याचा अंतिम लूक हा नक्कीच तुम्हाला आस्चर्यचकित करणार असेल असेही तिने सांगितले आहे.

रंगोली चंदेल ट्विट

दरम्यान, जेसन बद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी आजवर कॅप्टन मार्व्हल, ब्लेडरनर2049 सारखे मोठे प्रोजेक्ट्स केले आहेत. हॉलिवूडमधील नावाजलेले आणि महागडे मेकअप आर्टिस्ट अशी जेसन यांची ओळख आहे. 'द अमेरिकन हॉरर स्टोरी' या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय यांच्या दिग्दर्शनाखाली बनणार आहे. तामिळमध्ये 'थलैवी' तर हिंदीत 'जया' नावानं प्रदर्शित होणार आहे. येत्या दिवाळीनंतर या सिनेमाचे चितिरिकरण सुरु होईल.