जबरदस्त अॅक्शन असलेला कंगना रनौत च्या 'धाकड़' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित; गुप्तहेराच्या भूमिकेचे सोशल मिडीयावर कौतुक (Video)
Check out the first teaser of Kangana Ranaut's Dhaakad (Photo Credits: YouTube)

बॉलिवूड राणी, क्वीन कंगना रनौतचे (Kangana Ranaut) ग्रह पूर्णतः तिच्या अधीन असलेले दिसून येत आहेत. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'जजमेंटल है क्या' अजूनही चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचत असताना, आता तिच्या बहुप्रतीक्षित 'धाकड’ (Dhaakad) या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. टीजर पाहिल्यावर एकच प्रतिक्रिया उमटते ती म्हणजे वाह! टीजरमध्ये जे काही दिसते त्यावरून पुन्हा एकदा चित्रपटाची सर्व जबाबदारी कंगनाच्या खांद्यावर असल्याचे जाणवते. कंगनाही तिच्या परीने या भूमिकेला 100 टक्के न्याय देईल यात शंका नाही.

टीजरची सुरुवात मोठ्या डौलात, एखाद्या चित्त्याप्रमाणे पावले टाकत, हातात गन घेऊन येणाऱ्या कंगनाच्या एन्ट्रीने. समोर असलेल्या डबक्यात काही असल्याचे तिला जाणवते आणि त्यावर ती गोळ्यांची खैरात झाडते. शेवटी ओठावर ओघळणारे रक्त आणि एक भेदक नजर यामुळे संपूर्ण पडदा आणि आपले काळीज व्यापले जाते. टीजरमधील व्हिज्युअल्स देखील फार हटके आहेत. त्याला अजून प्रभावशाली बनवते ते बॅकग्राउंड स्कोअर.

तर अशा प्रकारे धाकडदेखील कंगनाला एक एजून एक हिट मिळवून देईल यात शंका नाही. या चित्रपटात कंगना 'एजंट अग्नी’ नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. या लुकचे, तिच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन

रजनीश घई यांनी 'धाकड' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर सोहेल मकलाई हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 2020 च्या दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.