Emergency Trailer Date (Photo Credit - Instagram)

Emergency Trailer Date: अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) राजकारणासोबतच चित्रपटांमध्येही सक्रिय आहे. कंगना रणौत लवकरच 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीच्या या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. अशातच निर्मात्यांनी आज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज डेट (Emergency Trailer Date) जाहीर केली आहे. कंगनाने चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून ट्रेलरशी संबंधित माहिती दिली आहे.

कंगना राणौतने शेअर केले इमर्जन्सी चित्रपटाचे पोस्टर -

'इमर्जन्सी'चा ट्रेलर 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. कंगना रणौतने चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरला कॅप्शन देताना कंगनाने म्हटलं आहे की, 'लोकशाही भारतीय इतिहासातील सर्वात काळ्या दिवसाचा साक्षीदार व्हा. सत्तेच्या लालसेने संपूर्ण देश जळून खाक झाला.' (हेही वाचा - Defamation Notice to Kangana Ranaut: राहुल गांधींचा मॉर्फ केलेला फोटो शेअर करणे कंगना राणौतला पडले महागात; 40 कोटींचा मानहानीचा खटला दाखल)

भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय आणि आणीबाणीची स्फोटक गाथा 6 सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 14 जूनला रिलीज होणार होता. पण लोकसभा निवडणुकीमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली आहे. (हेही वाचा - Kangana Ranaut Slapped by CISF Constable: नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने मारली थप्पड; चंदीगड विमानतळावर घडली घटना, अभिनेत्रीचा आरोप (Watch Video)

कंगना राणौत पोस्ट - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

'इमर्जन्सी' हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त श्रेयस तळपदे, अनुपम खेर आणि मिलिंद सोमण यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.