Gunjan Saxena: The Kargil Girl Trailer Date (Photo Credits: Twitter)

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) चा बहुप्रतीक्षित चित्रपट 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' (Gunjan Saxena…The Kargil Girl) नुकताच नेतफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यासोबतच हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे. या चित्रपटाविषयी भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला (Central Board of Film Certification) एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये आयएएफ ने चित्रपटाविषयी आक्षेप नोंदविला आहे. आयएएफच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात आयएएफची एक नकारात्मक प्रतिमा दर्शविली गेली आहे. याविषय हरकत व्यक्त करत भारतीय हवाई दलाने सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिले आहे. एएफएने आपल्या पत्रात नेटफ्लिक्स आणि धर्मा प्रॉडक्शनवर एअरफोर्सची प्रतिमा डागाळल्याचा आरोप केला आहे.

सेन्सॉर बोर्डाला लिहिलेल्या पत्रात, आयएएफने म्हटले आहे - 'धर्मा प्रॉडक्शनने भारतीय वायुसेनेचे प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करण्याचे मान्य केले होते आणि चित्रपट पुढच्या पिढीच्या अधिकाऱ्यांना प्रेरणादायी ठरेल यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे मान्य केले होते. परंतु, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा चित्रपटामधील काही सीन आणि संवाद भारतीय वायुसेनेच्या प्रतिमेला चुकीच्या पद्धतीने दर्शवित असल्याचे दिसले होते.’

एएनआय ट्वीट-

चित्रपटामधील महिलांबद्दल हवाई दलाच्या वृत्तीबद्दल वायुसेनेचे म्हणणे आहे की- 'आमची संस्था लिंगभेद करत नाही. भारतीय वायु सेना पुरुष आणि महिला दोन्ही कर्मचार्‍यांना समान संधी देते.’ आयएफने आपल्या पत्रामध्ये धर्मा प्रॉडक्शनला चित्रपटामधील आक्षेपार्ह सीन काढून चित्रपटात आवश्यक सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. जान्हवी कपूर स्टारर फिल्म 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' चे ट्रेलर 1 ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी बोलताना हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.