Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे जिम बंद; बॉलिवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ने शेअर हॉट योगा व्हिडीओ; Watch Video
Jacqueline Fernandez (PC - Instagram)

Coronavirus: भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच आज सकाळी भारतात कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात मॉल्स, शाळा, दुकाने, जीम बंद ठेवण्यात आल्या आहेत. जीम बंद असल्यामुळे बॉलिवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिने आपल्या घरातचं योगा केला आहे. सध्या सोशल मीडियावर जॅकलिनचे हॉट योगा व्हिडिओ (Yoga Video) व्हायरल होत आहे.

हे व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील स्वत: ला फिट ठेऊ शकता. जॅकलिन या व्हिडीओमध्ये स्ट्रेच योगा करताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये जॅकलिनने सांगितलं आहे की, ‘स्ट्रेचमुळे तुमचा मणका चांगला राहतो आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहता. योगा करणं मला खूप आवडतं. मी कुठेही असले तरी हा योगा करत असते. हा योगाप्रकार तुम्ही कुठेही करू शकता.’ (हेही वाचा - Coronavirus: ‘गेम ऑफ थ्रोन्स’ अभिनेता क्रिस्तोफर हिवजू याला कोरोना व्हायरसची लागण; इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून दिली माहिती)

 

View this post on Instagram

 

💖 make sure you put on some good relaxing music 💖💖💖 and breathe!!!

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

 

View this post on Instagram

 

Stretch 💖 keep that spine healthy and happy! Yoga poses are my fav, anytime, anywhere!

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

जॅकलिनने दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्यायाम करताना गाणं ऐकण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओला तिने ‘व्यायाम करताना चांगलं गाणं ऐकत श्वास घेत राहा. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल,’ असा सल्ला दिला आहे. जॅकलिनने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट्सही दिल्या आहेत.

याशिवाय बॉलिवुड अभिनेत्री कतरिना कैफनेदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घरच्या-घरी करता येईल असा वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने व्यायामाबद्दल माहितीही दिली आहे. मागील आठवड्यामध्ये जॅकलिन आणि बिग बॉस फेम आसिम रियाज यांचं होळीच्या निमित्ताने गाणं प्रदर्शित झालं होतं. जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती जॉन अब्राहमसोबत 'अ‍ॅटॅक' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.