Jacqueline Fernandez: नागार्जुनच्या 'द घोस्ट' या चित्रपटातून जॅकलिन फर्नांडिस बाहेर, हे कारण आले समोर
Jacqueline Fernandez & Nagaarjuna (Photo Credit - FB)

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखरसोबत असलेल्या कथित संबंधामुळे या चर्चा रंगल्या आहेत. इतकेच नाही तर काही दिवसापुर्वी जॅकलिनचे इंटिमेट फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर जॅकलिने मीडियाला तिचे वैयक्तिक फोटो व्हायरल करू नका असे आवाहन केले. जॅकलिनने ही पोस्ट तिच्या सोशल मीडियावर शेअर केली होती. अलीकडेच अशा बातम्या येत होत्या की जॅकलिन नागार्जुन अक्किनेनीच्या 'द घोस्ट' चित्रपटातून बाहेर पडली आहे. तसेच जॅकलिन या चित्रपटाचा भाग का नाही अशी विविध कारणे प्रत्येकजण लावत आहेत.

यामुळे जॅकलिनने नागार्जुनचा चित्रपट सोडला

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिन गेल्या वर्षी या प्रोजेक्टबद्दल बोलत होती. पण निर्मात्यांना चित्रपटासाठी आकारले जाणारे शुल्क परवडणारे नसल्याने त्यांनी यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच हा प्रकार घडला होता. निर्माता आणि जॅकलिन दोघांनीही शांतपणे त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टवर जाण्याचा निर्णय घेतला. आता नागार्जुनच्या या चित्रपटात कोणती हिरोईन असणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्याचवेळी, निर्मात्यांनी सांगितले की त्यांनी या चित्रपटाचे परदेशात शूटिंग करण्याची योजना आखली होती. मात्र कोरोनामुळे अद्याप तसे झालेले नाही. 'द घोस्ट' हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.

जॅकलिन फर्नांडिसपूर्वी ‘द घोस्ट’ या चित्रपटात काजल अग्रवालला कास्ट करण्यात आले होते. पण काजल प्रेग्नंट असल्यामुळे तिने चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर निर्मात्यांनी जॅकलिनची निवड केली होती. पण आता तिला देखील चित्रपटातून काढण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. (हे ही वाचा Ajay Devgn Visited Sabarimala Temple: 41 दिवसांचे कठोर व्रत केल्यानंतर अजय देवगणने घेतले शबरीमाला मंदिराचे दर्शन (See Video).)

काही दिवसांपूर्वीच जॅकलिन अर्जुन कपूर आणि सैफ अली खानसोबत ‘भूत पुलिस’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ‘विक्रांत रोना’ आणि किक 2 हे दोन चित्रपट आहेत. तसेच जॅकलिन अभिनेता अक्षय कुमारसोबत 'राम सेतू'मध्ये दिसणार आहे, तिच्यासोबत नुसरत भरुचाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती जॉन अब्राहमच्या 'अटॅक'मध्ये दिसणार आहे. जॅकलिनकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. जॅकलिन 'बच्चन पांडे' आणि रोहित शेट्टीच्या 'सर्कस'मध्ये दिसणार आहे.