अभिनेता इरफान खान विमानतळावर व्हिलचेअरवरुन तोंड लपवत जाताना दिसल्याने चाहत्यांना चिंता
इरफान खान (Photo Credits-Manav Manglani)

बॉलिवूड कलाकार इरफान खान (Irfan Khan) गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' (Angrezi Medium)  या चित्रपटाचे शूटिंग करत असल्याने लंडन येथे होता.मात्र नुकताच त्याला मुंबईतल्या विमानतळावर पाहिले गेले. त्यावेळी इरफान याने त्याचा चेहरा लपवला खरा पण त्यावेळी तो व्हिलचेअरवरुन जाताना दिसून आला. यामुळे इरफान याच्या चाहत्यांकडून त्याच्या या प्रकारामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या वर्षात इरफान खान त्याला झालेल्या कॅन्सर आजारावर उपचार करण्यासाठी लंडन येथे गेला होता. त्यानंतर लंडन येथून वर्षभरानंतर पुन्हा भारतात दाखल झाला होता. परंतु आता इरफान याला व्हिलचेअरवर पाहून पुन्हा त्याच्या प्रकृती बद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.असे म्हटले जात आहे की, इरफान त्याच्या आजारपणातून अद्याप पूर्णपणे बरा झाला नसून त्या मधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.(अभिनेता इरफान खान ह्याचा कॅन्सरशी यशस्वी लढा, चाहत्यांचे मानले आभार)

 

View this post on Instagram

 

#irfankhan snapped as he arrives in Mumbai early morning #getwellsoon #instadaily #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

इरफान याला व्हिलचेअरवर पाहून चाहत्यांकडून त्याचा आजार बरा होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. त्याला उद्भवलेल्या आजारपणामुळे इरफान गेल्या काही काळापासून बॉलिवूड पासून दूरावला आहे.इरफान खान आजारपणापासून थोडा बरा झाल्यानंतर त्याने 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले. हा चित्रपट 'हिंदी मीडियम' चित्रपटाचा सिक्वल असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या चित्रपटात इरफानसोबत राधिका मदान आणि करिना कपूर दिसून येणार आहे.