25 मार्च 2020... ही तारीख आणि वर्ष लोकांच्या मनात कायम राहील. देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) फैलाव झाल्यामुळे, संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने भारत सरकारने 25 मार्च 2020 पासून देशव्यापी लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण देश थांबला होता. मोठ मोठ्या कार्यालयांपासून ते ट्रेनपर्यंत सर्व काही बंद होते. 2020 मध्ये, देशवासीयांनी या बंद भारताचे असे दृश्य पाहिले ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आता दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar), देशातील हा लॉक डाऊन मोठ्या पडद्यावर पडण्याची तयारी करत आहेत.
नुकतेच मुधर भांडारकर यांनी लॉकडाउनवर आधारीत असणार्या ‘इंडिया लॉकडाउन’ (India Lockdown) चित्रपटाची घोषणा केली. आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले असून, त्यासोबत या चित्रपटाची स्टार कास्टही रिलीज झाली आहे. फिल्म समीक्षक तरण आदर्शने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध केले आहे. या पोस्टरमध्ये एक मोठे कुलूप दिसत असून, या कुलूपच्या समोर एक माणूस दोन मुलांना हातगाडीवर घेऊन जाताना दिसत आहे. याखेरीज कुलूपाच्या आसपास लोक आपली रोजची कामे करताना दिसत आहेत. मात्र यातून लॉक डाऊनमुळे सर्व कामे ठप्प झाली असल्याचे प्रतीत होत आहे. (हेही वाचा: Dhaakad Poster: धाकड़ सिनेमातील दिव्या दत्ता चा बोल्ड लूक आऊट)
Film India Lockdown is all set to go on floor next week. Here’s a teaser poster. Give your love. ❤️ @prateikbabbar @SaieTamhankar @AahanaKumra @shweta_official @ShihabZarin #PrakashBelawadi #IndiaLockdown pic.twitter.com/ZDnsWzajeX
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) January 21, 2021
या चित्रपटात प्रितीक बब्बर (Prateik Babbar), श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, सई ताम्हणकर (Sai Tamhankar), जरीन शिहाब आणि प्रकाश बेलवाडी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे शूटिंग पुढील आठवड्यापासून सुरू होईल. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असेल. मधुर भंडारकर यांनी महिन्याभरापूर्वी या चित्रपटाचे शीर्षक जाहीर केले होते, आज त्याचे पहिले पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. बातमीनुसार चित्रपटाचे बहुतेक शूटिंग मुंबई व आसपासच्या भागात होणार आहे.