ileana d'cruz (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (ileana d'cruz) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. तसेच ती आपलं वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे सोशल मिडियाच्या माध्यमातून करतच असते. नुकताच तिने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधून मला झोपेत चालण्याची सवय आहे असा नवीन खुलासा केला आहे. हे ऐकून तिचे चाहतेही अवाक् झाले. आणि इलियानाच्या काळजी पोटी तिच्या चाहत्यांनी तिला अनेक सल्ले दिले आहेत.

तिने ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ”आता मी या गोष्टीला पूर्णपणे स्वीकारले आहे की मला झोपेत चालण्याची सवय आहे. सकाळी उठल्यावर माझ्या पायाला सूज असते किंवा एखादी छोटी जखम तरी असते. यामागचं कारण हेच असावं". इलियानाच्या ट्विटवर उपाय सांगत तुझ्या बेडरुममध्ये कॅमेरा लावून ठेव, त्यामुळे तुला झोपेत चालण्याच्या सवयीबद्दल स्पष्टपणे समजेल, असा सल्ला एकाने दिला. तर दुसऱ्याने तिला डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्यास सांगितले.

सोशल मिडियावर बरीच चर्चेत असलेली इलियाना चित्रपटांपासून दूर आहे. मात्र तिचे खाजगी आयुष्य बरेच चर्चेत आहे. नुकतंच तिचं ऑस्ट्रेलियन प्रियकर अँड्र्यू नीबोन याच्याशी ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. इलियानाने तिच्या इन्स्टाग्रामवरून अँड्र्यूसोबतचे फोटो डिलीट केले. हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

तिने बॉलिवूडमध्ये बर्फी, रुस्तम, रेड या चित्रपटांमध्ये काम केले होते. हे तीनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.