आज जगभरात कोरोना व्हायरस सारखा महाभयाण विषाणू जितका थैमान घालत आहे तितकाच काहीसा कॅन्सर सारखा आजारही. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामुळे अनेकदा रुग्ण हतबल होतो, मानसिक तणावाखाली जातो. या आजारावर योग्य ती सर्जरी केल्यावर रुग्ण बरा होईलही मात्र उपचारादरम्यान मनातून पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. मात्र अशा लोकांना प्रेरणा देईल असा व्हिडिओ अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आहे त्याचे वडिल राकेश रोशन यांचा. गळ्याचा कॅन्सर झालेल्या राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी या आजारावर मात करत कशा पदधतीने स्वत:ला फिट ठेवत आहे हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे.
कॅन्सर च्या काळात गमावलेले आपले वजन नियंत्रणात आणण्यासाठी राकेश रोशन रोज सकाळी वर्कआऊट करतात. तेव्हाचा व्हिडिओ ऋतिकने शेअर केला आहे.
पाहा व्हिडिओ:
हेदेखील वाचा- मला आधीपासूनच ठाऊक होतं Cancer आहे; Hrithik Roshan चे वडील Rakesh Roshan यांचा खुलासा
या व्हिडिओखाली 'माझे वडिल माझे प्रेरणा स्त्रोत आहेत' असे म्हटले आहे. 2019 वर्षाच्या सुरवातीला जानेवारी महिन्यात ह्रितिक रोशनने (Hrithik Roshan) आपले वडील राकेश रोशन यांना कॅन्सर असल्याचं सांगितलं आणि फॅन्सना धक्का बसला. राकेश रोशन गळ्याच्या कॅन्सरच्या सुरवातीच्या स्टेज मध्ये असल्याचं सांगून त्याने आपल्या वडिलांसाठी चिंता व्यक्त करत त्यांच्या तंदुरुस्तीसाठी दुवा मागण्याचं आवाहन फॅन्सना केलं होतं.