Harman Baweja’s Wedding: प्रियंका चोपड़ासह स्क्रिन शेअर केलेल्या हरमन बावेजा चा साशा रामचंदानीसह झाला विवाह, Inside Photos आले समोर
Harmna Baweja and Sasha Ramchandani Wedding (Photo Credits: Instagram)

प्रियंका चोपड़ासह 'Whats Your Raashee' या चित्रपटात काम केलेला अभिनेता हरमन बावेजा (Harman Baweja) आज साशा रामचंदानीसह (Sasha Ramchandani) लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नसोहळ्याचे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हरमन आणि साशा या दोघांनी शीखांच्या विधिवत पद्धतीने लग्न केले आहे. हरमनचे आनंद करजचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर समोर येत आहे. यात हरमन आणि साशा यांची जोडी पाहून सर्वांच्या नजरा खिळतील. दोघेही पारंपारिक वेषात खूप सुंदर दिसत आहेत.

या लग्नसोहळ्यासाठी हरमनने गुलाबी रंगाच्या शेरवानीसह सफेद रंगाचा साफा घातला आहे. तर साशाने मरून आणि सिल्वर रंगाचा लेहंगा घातला आहे.

हेदेखील वाचा- Alia Bhatt ची मैत्रिण Rhea Khurana च्या लग्नात धूम; 'Genda Phool' गाण्यावर केला धमाकेदार डान्स (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jay Shewakramani (@jayshewakramani)

या दोघांच्या या विवाहसोहळ्यातील अनेक फोटोज आणि व्हिडिओज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हरमनचे चाहते त्याला सोशल मिडियाच्या माध्यमातून या जोडीला शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

हरमन बावेजाने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात 2008 मध्ये प्रियंका चोपड़ा सह 'लव स्टोरी 2050' मधून केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर हरमनने विक्ट्री, व्हॉट्स योर राशि आणि ढिश्कियाऊं या चित्रपटात काम केले. मात्र हे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकले नाही. अखेर 2014 नंतर हरमनने कोणत्याच चित्रपटात दिसला नाही.