Gauahar Khan-Zaid Darbar Wedding Card: गौहर खान ने डिजिटल लग्नपत्रिकेतून चाहत्यांना सांगितली आपली लव्हस्टोरी, Watch Video
Gauahar Khan-Zaid Darbar Wedding Card (Photo Credits: Instagram)

बिग बॉस 7 ची ची विजेती अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) हिला सध्या लग्नाचे वेध लागले आहेत. ती लवकरच झैद दरबार (Zaid Darbar) सोबत विवाहबंधनात अडकणार असून तिच्या घरी आणि झैद च्या घरी जोरदार तयारी सुरु झाली आहे. गौहर खान आपल्या निकाहला घेऊन खूपच एक्सायटेड असून आपल्या लग्नासंबंधीची सर्व माहिती ती सोशल मिडियाद्वारे आपल्या चाहत्यांना देत आहे. नुकतीच तिने आपल्या लग्नाची पत्रिका इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. मात्र ही लग्नपत्रिका इतर लग्नपत्रिकांपेक्षा थोडी हटके आहे. ही डिजिटल लग्नपत्रिका (Digital Wedding Invitation) असून या लग्नपत्रिकेत गौहर आणि झैद ची लव्हस्टोरी सांगण्यात आली आहे.

हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून गौहर खान इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टखाली 'जब वी मेट' असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओ गौहर आणि झैदची पहिली भेट कुठे, कधी आणि कशी झाली ते दाखविण्यात आले. त्यानंतर या भेटीतून मैत्री, मैत्रीतून प्रेमआणि प्रेमातून लग्नापर्यंतचा टप्पा कसा गाठला हे ही या लव्हस्टोरीमध्ये दाखविण्यात आले आहे. झैदने गौहरला कसं प्रपोज केलं ही हे यात दाखविण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Neha Kakkar चे 'Baby Bump' असलेल्या वायरल फोटोमागील सत्य आले समोर, इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन गायिकेने दिली 'ही' माहिती

 

View this post on Instagram

 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

सध्या डिजिटल निमंत्रण पत्रिका ही कल्पना प्रचंड ट्रेंड होत आहे. त्यात थोडं वेगळंपण गौहरच्या पत्रिकेत पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. येत्या 25 डिसेंबरला गौहर खान आणि झैद दरबारचा निकाह होणार आहे. मुंबईल्या एका बड्या हॉटेलमध्ये झैद आणि गौहरचा निकाह होणार आहे.