Cheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित
चिट इंडिया ( फोटो सौजन्य- ट्विटर )

सध्या बॉलिवूडमध्ये विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. अशा चित्रपटांचे पडसाद काही वेळेस चांगले किंवा वाईट पडलेले दिसून आले आहेत. त्यामुळे आता इम्रान हाश्मीसुद्धा त्याचा आगामी चित्रपट चिट इंडिया (Cheat India ) मधून नकारात्मक भूमिका करताना दिसून येणार आहे. तर आज या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.

इम्रानच्या या चित्रपटाची कथा ही सध्याच्या शिक्षण पद्धतीवरील आहे. तसेच एखाद्या शिक्षणाच्या प्रवेशासाठी काय काय व्याप केले जातात हे दाखविण्यात येणार आहे. तसेच राकेश सिंह नावाची भूमिका साकारलेला इम्रान हा पालकांकडून डोनेशन घेऊन प्रवेश मिळवून देताना दिसणार आहे. या टीझरची सुरुवातीला इम्रानच्या एका भाष्यामुळे सध्याची शिक्षण पद्धतीची काय अवस्था झाली आहे याचा विचारही करता येणार नाही.

या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज,अतुल कासबेकर, तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्मी यांनी केली आहे. तसेच इम्रानसोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत श्रेया धनवंतरी दिसून येणार आहे. तसेच चिट इंडिया हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.