ड्रग्ज प्रकरणाच्या (Drugs Controversy) एनसीबीच्या (NCB) चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. याआधी या प्रकरणामध्ये बॉलीवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांची नावे चर्चेत आहेत. आता बर्याच मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, या प्रकरणात सुप्रसिद्ध अभिनेत्री दीया मिर्झा (Dia Mirza) हिचे नावही सहभागी आहे. त्याच वेळी, अशी बातमी देखील आली की दीया मिर्झा हिलादेखील या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समन्स बजावले जाऊ शकते. आता या सर्व बातम्यांच्या दरम्यान स्वत: दिया मिर्झाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दियाने आपली बाजू मांडली आहे. ड्रग्ज प्रकरणात स्पष्टीकरण देताना तिने या सर्व गोष्टी खोट्या व चुकीच्या असल्याचे सांगितले आहे.
दीया मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे, 'माझा ड्रग प्रकरणातील सहभाग ही बातमी पूर्णतः खोटी, निराधार आणि वाईट हेतूने पसरवण्यात आली आहे. या बातमीचे मी खंडन करते. अशा चुकीच्या, वाईट रिपोर्टिंगचा थेट परिणाम माझ्या प्रतिष्ठेवर होत आहे. तसेच माझ्या कारकिर्दीचेही नुकसान होत आहे जी मी इतक्या वर्षांच्या मेहनतीने उभी केली आहे. मी माझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा मादक किंवा प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केले नाही. या प्रकरणात भारताची नागरिक म्हणून मी संपूर्ण कायदेशीर मदत घेईन. माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल माझ्या समर्थकांचे आभार.' (हेही वाचा: ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश ला समन्स)
View this post on Instagram
दीयाला या पोस्टवर तिच्या चाहत्यांचा पाठिंबा मिळत आहे. यासह, तिच्या पोस्टवर कमेंटद्वारे, अनेक सेलिब्रिटींनी देखील आपला सपोर्ट व्यक्त केला आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात एनसीबीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. दीया व्यतिरिक्त या प्रकरणात बॉलिवूडमधील आणखी अनेक नामवंत कलाकारांची नावे समोर आली आहेत. एनसीबी चौकशीत ड्रग पेडलर अनुज केसवानीने बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचे नाव घेतले आहे. दीया मिर्झाची मॅनेजरही ड्रग्ज खरेदी करत असे, असे समोर आले आहे. यासह यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरचेही चर्चेत आहे.