Deepika Padukone Criticised L&T Chairman SN Subrahmanyan: मानसिक आरोग्याची प्रबळ समर्थक अभिनेत्री दीपिका पदुकोण(Deepika Padukone) हिने एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम(SN Subrahmanyan) यांच्या खळबळजनक विधानावर थेट सोशल मिडीयाद्वारे नाराजी व्यक्त केली. आकही दिवसांपूर्वी एक मुलाखतीत एसएन सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांना रविवारीही काम करण्याचे आवाहन केले होते. त्याशिवाय, आठवड्यातून 90 तास काम करण्याबद्दलही त्यांनी विधान केले होते. अभिनेत्रीने त्यांच्या या वक्तव्याला नाराजी दर्शवली आहे. (L&T chairman SN Subrahmanyan:'आठवड्यातून 90 तास काम करा', एल अँड टीचे एस एन सुब्रमण्यम नारायणमूर्ती यांच्याही एक पाऊल पुढे)
दीपिका पदुकोणची नाराजी व्यक्त
L&T CMD and work life balance
दिपीकाने इंस्टाग्राम स्टोरीजवर पत्रकार फेय डिसोझा यांचा अहवाल शेअर केला, "एवढ्या वरिष्ठ पदांवर असलेले लोक अशी विधाने करतात हे पाहून धक्का बसतो," असे म्हणत #MentalHealthMatters हा हॅशटॅग जोडला. त्याशिवाय, ती तिथेच थांबली नाही. या प्रतिक्रियेनंतर एल अँड टीने भारताच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणारे एक निवेदन जारी केले, त्यावरही दीपिकाने आणखी टीका केली आणि म्हटलेची, "त्यांनी परिस्थिती आणखी वाईट केली."