बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य (Choreographer Ganesh Acharya) यांनी आतापर्यंत आपल्या हटके डान्स स्टाईलने रसिकांचे मन जिंकले आहे. आता त्यांच्या बॉडी ट्रांसफॉर्मेशनची (Body Transformation) सर्वत्र चर्चा आहे. यापूर्वी राम कपूर आणि अदनाम सामी यांच्या वेट लॉस जर्नी बद्दल आपण ऐकले होते. त्यांच्या बॉडी ट्रांसफॉर्मेशन आपण पाहिले. आता गणेश आचार्य आपल्या फिटनेसने लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गणेश यांनी पूर्वी तब्बल 200 किलो वजन कमी केले होते. तसंच द कपिल शर्मा शो मध्ये त्यांनी तब्बल 98 किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला आहे.
सोनी टीव्ही अलिकडचे द कपिल शर्मा शो चा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या एपिसोड मध्ये गणेश आचार्य आपल्या बॉडी ट्रांसफॉर्मेशन बद्दल बोलतील. गणेश आचार्य यांनी ट्रेनर अजय नायडू यांच्या मदतीने वजन कमी करण्याचे आपले लक्ष्य साध्य केले आहे.
View this post on Instagram
हाऊसफूल 3 चे एक गाणे शूट करत असताना आपले वजन खूपच वाढल्याचे जाणवले, असे गणेश आचार्य यांनी सांगितले. त्यामुळे त्यावर काम करणे गरजेचे असल्याचे त्यांना वाटू लागले आणि गेल्या दीड वर्षात त्यांनी तब्बल 80 किलो वजन कमी केले आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर गणेश आचार्य यांचे खूप सारे फोटोज, व्हिडिओज आहेत. त्यात ते जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
वजन कमी झाल्यामुळे डान्स करताना त्यांना आता अधिक एनर्जेटीक वाटतं. तसंच 7XL साईजच्या कपड्यांवरुन ते लार्ज साईजवर आले असल्याचेही त्यांनी सांगितले.